कणा
ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतींत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली
भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले
कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे
खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!
कुसुमाग्रज
कुसुमाग्रज
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
ते देशासाठी लढले
ते अमर हुतात्मे झाले!
सोडिले सर्व घरदार
त्यागिला मधुर संसार
ज्योतीसम जीवन जगले
ते देशासाठी लढले !
तो तुरुंग, ते उपवास
ते साखळदंड तनूस
कुणी फासावरती चढले
ते देशासाठी लढले !
झगडली-झुंजली जनता
मग स्वतंत्र झाली माता
हिमशिखरी ध्वज फडफडले
ते देशासाठी लढले !
कितिकांनी दिले प्राणास
हा विसरु नका इतिहास....
पलित्याची ज्वाला झाले
ते देशासाठी लढले !
हा राष्टध्वज साक्षीला
करू आपण वंदन याला
जयगीत गाऊया अपुले
ते देशासाठी लढले !
- वि. म. कुलकर्णी
हळूंच या हो हळूंच या !
हळूंच या हो हळूंच या ! llध्रु०ll
गोड सकाळीं ऊन पडे
दंवबिंदूंचे पडति सडे
हिरव्या पानांतुन वरती
येवोनी फुललों जगतीं
हृदयें अमुचीं इवलींशीं
परि गंधाच्या मधिं राशी
हांसुन डोलुन
देतों उधळुन
सुगंध या तो सेवाया
हळूंच या पण हळूंच या ! ll१ll
कधिं पानांच्या आड दडूं
कधिं आणूं लटकेंच रडूं
कधिं वार्याच्या झोतानें
डोलत बसतों गमतीनें
तर्हेतर्हेचे रंग किती
अमुच्या या अंगावरतीं
निर्मल सुंदर
अमुचें अंतर
या आम्हांला भेटाया
हळूंच या पण हळूंच या ! ll२ll
- कुसुमाग्रज
सूर म्हणतो साथ दे,
दिवा म्हणतो वात दे.
उन्हामधल्या म्हातार्याला
फक्त तुझा हात दे!
आभाळ म्हणत सावली दे
जमीन म्हणते पाणी दे!
माळावरच्या म्हातार्याला
फक्त तुझी गाणी दे!
कावळा म्हणतो पंख दे,
चिमणी म्हणते खोपा दे,
माझ्यासारख्या आजोबाला
फक्त तुझा पापा दे!
-कुसुमाग्रजया लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार
नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार
आईस देव माना, वंदा गुरूजनांना
जगी भावनेहूनी त्या कर्तव्य थोर जाणा
गंगेपरी पवित्र ठेवा मनी विचार
शिवबापरी जगात दिलदार शूर व्हावे
टिळकांपरी सदैव ध्येयास त्या पूजावे
जे चांगले जगी या त्याचा करा स्वीकार
शाळेत रोज जाता ते ज्ञानबिंदू मिळवा
हृदयात आपुल्या त्या देशाभिमान ठेवा
कुलशील छान राखा ठेऊ नका विकार
*मधुकर जोशी
https://www.youtube.com/watch?v=27muQKsKa_k
मला वाटते बसुनी विमानी आकाशातून हिंडावे
किंवा सुंदर नौकेमधूनी समुद्रातूनी भटकावे
निळा निळा तो समोर डोंगर चढुनी वरती पहावे
राज्य तयांचे जाऊनी तेथे राज्य पदाते मिळवावे
परी भूमीवर संध्याकाळी छायाकळी जो धावे
तेव्हा वाटे सोडुनी सकळा निज मातेला बिलगावे
गिरी शिखरावरूनी सोगे सुटले ढगांचे
ओले हिरवे दिवस येती जाती श्रावणा चे
ओल्याचिंब अवकाशी आर्त नाद पावशाचा
पान फूल होऊ पाहे कण कण मृत्तीकेचा
मिटे फुले डोंगरात फूल उन सावल्यांचे
स्वप्न दिवसाच्या डोळा तरळते चांदण्यांचे
विष्णुकांतीच्या फुलांच्या पसरल्या निळ्या राशी
सहस्राक्ष आन्थरितो नेत्र धरेच्या पायाशी
गवताच्या पात्यापरी भिजलेले माझे मन
इंद्रधनुष्याशी नाते जोडी तन्मय होऊन
* वा. रा. कांत (इयत्ता - पाचवी 1986)
गवतफुला - इंदिरा संत
रंगरंगुल्या, सानसानुल्या,
गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे मला लागला,
सांग तुझा रे तुझा लळा.
मित्रासंगे माळावरती,
पतंग उडवित फिरताना;
तुला पाहिले गवतावरती,
झुलता झुलता हसताना.
विसरुनी गेलो, पतंग नभीचा,
विसरून गेलो मित्राला;
पाहून तुजला हरखुन गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा.
हिरवी नाजुक, रेशिम पाती,
दोन बाजुला सळसळती;
नीळ निळुली एक पाकळी,
पराग पिवळे झगमगती.
तळी पुन्हा अन गोजिरवाणी,
लाल पाकळी खुलते रे;
उन्हामध्ये हे रंग पाहता,
भानच हरपुनी गेले रे
पहाटवेळी आभाळ येते,
लहान होउनी तुझ्याहुनी;
तुला भरविते निळ्या करांनी,
दवमोत्यांची कणी कणी.
वारा घेवूनी रूप सानुले,
खेळ खेळतो झोपाळा;
रात्रही इवली होऊन म्हणते
अंगाईचे गीत तुला.
गोजिरवाणा हो रवीचा कण
छाया होते इवलीशी;
तुझ्या संगती लपून खेळते,
रमून जाते पहा कशी.
तुझी गोजिरी, शिकून भाषा,
गोष्टी तुजला सांगाव्या;
तुझे शिकावे खेळ आणखी,
जादू तुजला शिकवाव्या.
आभाळाशी हट्ट करावा
खाऊ खावा तुझ्यासवे;
तुझे घालुनी रंगीत कपडे,
फुलपाखरां फसवावे.
मलाही वाटे लहान व्हावे
तुझ्याहूनही लहान रे;
तुझ्या संगती सदा रहावे,
विसरुनी शाळा घर सारे
*इंदिरा संत
येथल्या चराचरात राहते मराठी
अमर हुतात्मे झाले!
ते देशासाठी लढले
ते अमर हुतात्मे झाले!
सोडिले सर्व घरदार
त्यागिला मधुर संसार
ज्योतीसम जीवन जगले
ते देशासाठी लढले !
तो तुरुंग, ते उपवास
ते साखळदंड तनूस
कुणी फासावरती चढले
ते देशासाठी लढले !
झगडली-झुंजली जनता
मग स्वतंत्र झाली माता
हिमशिखरी ध्वज फडफडले
ते देशासाठी लढले !
कितिकांनी दिले प्राणास
हा विसरु नका इतिहास....
पलित्याची ज्वाला झाले
ते देशासाठी लढले !
हा राष्टध्वज साक्षीला
करू आपण वंदन याला
जयगीत गाऊया अपुले
ते देशासाठी लढले !
- वि. म. कुलकर्णी
हळूंच या हो हळूंच या !
हळूंच या हो हळूंच या ! llध्रु०ll
गोड सकाळीं ऊन पडे
दंवबिंदूंचे पडति सडे
हिरव्या पानांतुन वरती
येवोनी फुललों जगतीं
हृदयें अमुचीं इवलींशीं
परि गंधाच्या मधिं राशी
हांसुन डोलुन
देतों उधळुन
सुगंध या तो सेवाया
हळूंच या पण हळूंच या ! ll१ll
कधिं पानांच्या आड दडूं
कधिं आणूं लटकेंच रडूं
कधिं वार्याच्या झोतानें
डोलत बसतों गमतीनें
तर्हेतर्हेचे रंग किती
अमुच्या या अंगावरतीं
निर्मल सुंदर
अमुचें अंतर
या आम्हांला भेटाया
हळूंच या पण हळूंच या ! ll२ll
- कुसुमाग्रज
सूर म्हणतो साथ दे,
दिवा म्हणतो वात दे.
उन्हामधल्या म्हातार्याला
फक्त तुझा हात दे!
आभाळ म्हणत सावली दे
जमीन म्हणते पाणी दे!
माळावरच्या म्हातार्याला
फक्त तुझी गाणी दे!
कावळा म्हणतो पंख दे,
चिमणी म्हणते खोपा दे,
माझ्यासारख्या आजोबाला
फक्त तुझा पापा दे!
-कुसुमाग्रजया लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार
नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार
आईस देव माना, वंदा गुरूजनांना
जगी भावनेहूनी त्या कर्तव्य थोर जाणा
गंगेपरी पवित्र ठेवा मनी विचार
शिवबापरी जगात दिलदार शूर व्हावे
टिळकांपरी सदैव ध्येयास त्या पूजावे
जे चांगले जगी या त्याचा करा स्वीकार
शाळेत रोज जाता ते ज्ञानबिंदू मिळवा
हृदयात आपुल्या त्या देशाभिमान ठेवा
कुलशील छान राखा ठेऊ नका विकार
*मधुकर जोशी
https://www.youtube.com/watch?v=27muQKsKa_k
मला वाटते बसुनी विमानी आकाशातून हिंडावे
किंवा सुंदर नौकेमधूनी समुद्रातूनी भटकावे
निळा निळा तो समोर डोंगर चढुनी वरती पहावे
राज्य तयांचे जाऊनी तेथे राज्य पदाते मिळवावे
परी भूमीवर संध्याकाळी छायाकळी जो धावे
तेव्हा वाटे सोडुनी सकळा निज मातेला बिलगावे
गिरी शिखरावरूनी सोगे सुटले ढगांचे
ओले हिरवे दिवस येती जाती श्रावणा चे
ओल्याचिंब अवकाशी आर्त नाद पावशाचा
पान फूल होऊ पाहे कण कण मृत्तीकेचा
मिटे फुले डोंगरात फूल उन सावल्यांचे
स्वप्न दिवसाच्या डोळा तरळते चांदण्यांचे
विष्णुकांतीच्या फुलांच्या पसरल्या निळ्या राशी
सहस्राक्ष आन्थरितो नेत्र धरेच्या पायाशी
गवताच्या पात्यापरी भिजलेले माझे मन
इंद्रधनुष्याशी नाते जोडी तन्मय होऊन
* वा. रा. कांत (इयत्ता - पाचवी 1986)
गवतफुला - इंदिरा संत
रंगरंगुल्या, सानसानुल्या,
गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे मला लागला,
सांग तुझा रे तुझा लळा.
मित्रासंगे माळावरती,
पतंग उडवित फिरताना;
तुला पाहिले गवतावरती,
झुलता झुलता हसताना.
विसरुनी गेलो, पतंग नभीचा,
विसरून गेलो मित्राला;
पाहून तुजला हरखुन गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा.
हिरवी नाजुक, रेशिम पाती,
दोन बाजुला सळसळती;
नीळ निळुली एक पाकळी,
पराग पिवळे झगमगती.
तळी पुन्हा अन गोजिरवाणी,
लाल पाकळी खुलते रे;
उन्हामध्ये हे रंग पाहता,
भानच हरपुनी गेले रे
पहाटवेळी आभाळ येते,
लहान होउनी तुझ्याहुनी;
तुला भरविते निळ्या करांनी,
दवमोत्यांची कणी कणी.
वारा घेवूनी रूप सानुले,
खेळ खेळतो झोपाळा;
रात्रही इवली होऊन म्हणते
अंगाईचे गीत तुला.
गोजिरवाणा हो रवीचा कण
छाया होते इवलीशी;
तुझ्या संगती लपून खेळते,
रमून जाते पहा कशी.
तुझी गोजिरी, शिकून भाषा,
गोष्टी तुजला सांगाव्या;
तुझे शिकावे खेळ आणखी,
जादू तुजला शिकवाव्या.
आभाळाशी हट्ट करावा
खाऊ खावा तुझ्यासवे;
तुझे घालुनी रंगीत कपडे,
फुलपाखरां फसवावे.
मलाही वाटे लहान व्हावे
तुझ्याहूनही लहान रे;
तुझ्या संगती सदा रहावे,
विसरुनी शाळा घर सारे
*इंदिरा संत
इंदिरा संतांची ही कविता इ.सातवीत शिकली होती.ती कायम स्मृतीत आहे.आज पुन्हा वाचल्यास स्वतःला लहान झाल्यासारखे वाटलेले.आनन्द झाला
उत्तर द्याहटवा