भारताची खगोलअभ्यास वेधशाळा- अॅस्ट्रोसॅट!
ब्रह्मांडातील वस्तूंचा वेध घेण्याची धडपड जगभरात
सुरू आहे. यामध्ये भारतही मागे नाही.
ब्रह्मांडातील वस्तूंचा वेध घेण्याची धडपड जगभरात
सुरू आहे. यामध्ये भारतही मागे नाही. सोमवारी भारतीय अंतराळ संस्थेने (इस्रो) पहिला खगोलीय
उपग्रह अवकाशात पाठविला आणि अंतराळविज्ञान क्षेत्रात नवी प्रगती केली. हा उपग्रह
सोडणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. या यशानिमित्त सॉफ्ट एक्स-रे टेलिस्कोप विकसित करणाऱ्या टाटा मूलभूत विज्ञान संस्थेच्या चमूतील विनीता नवलकर यांनी ‘अॅस्ट्रोसॅट’चा मांडलेला प्रवास.
आपल्यापासून जे लांब असते त्याची आपल्याला खूप उत्सुकता असते. तेथे घडणाऱ्या घडमोडींची माहिती आपल्याला व्हावी असे माणसाला वाटत असते. यातूनच
विज्ञान आणि संशोधनाच्या शाखा विकसित होत गेल्या. खगोलशास्त्र हा तर पूर्णत: कुतूहल
आणि नावीन्याने भरलेला विषय आहे. यातूनच
माणूस चंद्र, मंगळ या ग्रहांपर्यंत पोहचू शकला. पण तरीही असे अनेक प्रश्न
आहेत जे आजही अनुत्तरीत आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी जगातील विविध देश अंतराळ मोहिमांची आखणी करतात. यातूनच
भारताच्या ‘अॅस्ट्रोसॅट’चा जन्म झाला आणि या मोहिमेचा पहिला टप्पा सोमवारी यशस्वीही झाला.
अॅस्ट्रोसॅट हा भारताचा पहिला खगोलशास्त्रसाठी समर्पित उपग्रह आहे. या उपग्रहामुळे आपल्याला खगोलीय घटना व खगोलीय वस्तूंची सखोल माहिती मिळू शकणार आहे. या उपग्रहाचे ठळक वैशिष्टय़ म्हणजे एकाच उपग्रहाद्वारे,
एकाच वेळी विद्युतचुंबकीय तरंगलहरींच्या एका रुंद पट्टय़ांचे निरीक्षण करणे सहज, सोपे होणार आहे. दृश्य, अतिनील, मृदू आणि कठीण क्ष-किरण अशा विविध तरंगलहरींमध्ये आपण ब्रह्मांडातील वस्तूंचा वेध घेऊ शकतो. आतापर्यंत जगभरातून सोडण्यात आलेल्या अनेक दुर्बणिी पृथ्वीभोवती फिरत आहेत. पण त्या सर्वाची निरीक्षणक्षमता काही ठराविक तरंगलहरींपुरती मर्यादित आहे. या सर्वाच्या पुढे जाऊन भारताने ‘अॅस्ट्रोसॅट’ विकसित केला. म्हणूनच भारताची ही मोहीम नासापेक्षा एक पाऊल पुढे आहे, असे म्हटले
जाते.
‘अॅस्ट्रोसॅट’ची संकल्पना १९९६ मध्ये पहिल्यांदा मांडण्यात आली व २००० मध्ये त्याचा सखोल अहवाल ‘इस्रो’कडे सादर केला गेला. हा अहवाल स्वीकारून २००२ मध्ये इस्रोने, प्राथमिक निधी उपलब्ध करून दिला. तत्कालीन केंद्र सरकारने २००४ मध्ये या मोहिमेला अधिकृत मान्यता देऊन पुढील निधी प्रदान केला. यानंतर
पंधरा वर्षांच्या कालावधीनंतर,
भारतीय
शास्त्रज्ञांच्या अतोनात मेहनतीने हा उपग्रह तयार झाला. त्यात भारतातल्या आघाडीच्या वैज्ञानिक संस्थांनी मोलाचे योगदान दिले. यामध्ये टाटा मूलभूत संशोधन संथा (टीआयएफआर) मुंबई, इंटर युनिवर्सटिी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स (आयुका) पुणे, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स (आयआयए) बंगळुरू, रामन रिसर्च
संस्था (आरआरआय) बंगळुरू आणि इस्रो या संस्थांचा समावेश आहे. या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे अशा प्रकारचा उपग्रह पहिल्यांदाच बनवण्यात आला असल्यामुळे या उपग्रहावरची बहुतांश उपकरणे कोणत्याही पाश्चात्त्य तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता भारतातच विकसित केली गेली आहेत.
या उपग्रहावर पाच विविध उपकरणे बसवण्यात आली आहेत. त्यातील सर्वात
पहिले आणि मध्यभागी असलेले उपकरण म्हणजे ‘अल्ट्रावॉयलेट इमेजिंग टेलिस्कोप’ (यूव्हीआयटी). या दुर्बणिीचे दृष्टीक्षेत्र मोठे असल्यामुळे एकाच वेळी अवकाशाच्या मोठय़ा भागाचे निरीक्षण करणे सहज शक्य होणार आहे. अवकाशातून येणाऱ्या दृश्य व अतिनील लहरींची छायाचित्रे घेण्याचे काम ही दुर्बीण करेल. या छायाचित्रांमधून, अशा लहरी उत्सर्जति करणाऱ्या खगोलीय वस्तूंचा अभ्यास आपल्याला करता येईल. ‘आयुका’ आणि ‘आयआयए’ने मिळून यूव्हीआयटी तयार केलेली
आहे. त्यातील कॅमेरा सेन्सर, कॅनडा स्पेस सेंटरने बनविले आहेत. या उपग्रहावरील तीन उपकरणे ‘टीआयएफआर’मध्ये तयार करण्यात आली आहेत. डॉ. जे. एस. यादव व त्यांच्या चमूने ‘लार्ज एरिया प्रोपोर्शनल काउंटर’ (एलएएक्सपीसी) तयार केला आहे. त्यात त्यांना ‘आरआरआय’ची मोलाची साथ लाभली.
एलएएक्सपीसीद्वारे आपल्याला क्ष-किरण उत्सर्जति करणारे
जोड तारे व काही ठराविक आकाशगंगांच्या केंद्रांचा सखोल अभ्यास करता येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा